अँथनी अल्बानीज सलग दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी   

मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधानपदाची निवडणूक अँथनी अल्बानीज यांनी जिंकली आहे. २००४ नंतर पहिल्यांदाच, ऑस्ट्रेलियातील पंतप्रधान सलग दुसर्‍यांदा सत्तेत आले आहेत. गेल्या २१ वर्षांत अल्बानीज यांना सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी बहुमताबाबत विश्वास व्यक्त केला होता. निवडणूक प्रचारात त्यांची कामगिरी विरोधी पक्षनेते पीटर डटन यांच्यापेक्षा चांगली होती. यामुळे अँथनी अल्बानीजने पीटर डटन यांचा पराभव केला. एवढेच नाही, तर डटन यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 
 
अल्बानीज यांच्याबद्दल बोलताना लेबर खासदार लिंडा बर्नी म्हणाले, अल्बानीज हे खूप प्रेमळ स्वभावाचे आहे. त्यांनी मला खूप मदत केली आहे.चीनसोबत चांगले संबंध ठेवण्याचे आव्हान विजयानंतर अल्बानीज म्हणाले, ’आम्ही परदेशातून प्रेरणा घेत नाही. ही प्रेरणा आम्हाला आमचे नागरिक आणि त्यांची मूल्ये यातूनच मिळते. अल्बानीज यांच्या समोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील संबंध चांगले ठेवणे. चीन हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे, परंतु प्रादेशिक प्रभाव आणि सुरक्षा मुद्द्यांवरून त्यांच्यासोबत मतभेद अधिकच वाढले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल आणि सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल अँथनी अल्बानीज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील वाढत्या धोरणात्मक संबंधांना अधिक चालना देण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीचे सामायिक ध्येय पुढे नेण्यासाठी अल्बानीजसोबत काम करण्यास ते उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

Related Articles